शुक्रवारी दिल्लीच्या सराफा बाजारामध्ये सोने ५० रुपयांच्या वाढीसह प्रति १० ग्रॅमसाठी ३१२५० रुपयांच्या स्तरावर आले.किंमतीमधील वाढीमुळे स्थानिक ज्वेलर्सने मोठ्या प्रमाणात खरेदी केल्यामुळे तसेच सकारात्म वैश्विक संकेतामुळे ही वाढ दिसून आली आहे.तसेच चांदीच्या दरातही १५० रुपयांची वाढ दिसून आली. प्रति किलो चांदी ३९२०० रुपये झाली आहे. औद्योगिक मागणी आणि शिक्के निर्मात्यांकडून आलेली मागणी यामुळे चांदीतही तेजी दिसू आली. व्यापाऱ्यांनुसार डॉलरमध्ये घसरण आल्या मुळे सोन्या-चांदीसाठी सकारात्मक वैश्विक संकेत मिळाले. वैश्विक पातळीवर सिंगापूरमध्ये सोने ०.४८ टक्क्यांनी वाढत १६.४३ डॉलर प्रति औंस झाली आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews